STORYMIRROR

Malati Semale

Romance

3.0  

Malati Semale

Romance

रुप मनोहर

रुप मनोहर

1 min
41.9K


रुप मनोहर,अमोल सुंदर

निसर्ग शोभतो या भूवरी,

डोंगर दऱ्यांवर नटलेली

हिरवळ नयनी मोद भरी.


लवलव हिरवी झाडेवेली

बहरून आली सृष्टी सारी,

ऊन बागडे अवतीभवती

हिरव्या रानी कडे कपारी.


नभस्थ होते कृष्णमेघ ते

वर्षित अखंड पाऊस धारा,

फळाफुलांचा गंध दळवळे

धरतीवरती फिरवीत नजरा.


किलबिलाट तो घरट्यामधला

फडफड चाले फांदीवरती,

रानावनी मग आश्रय शोधित

कळपात पशु जणु कुरणावरती.


समुद्र,सागर,,सरोवर,धरणे

जलसंपदा ही दृष्टीस पडे,

नद्या नल्यातून उसळत लहरी

जाती शोधत मार्ग पुढे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance