वार्धक्य
वार्धक्य

1 min

7.3K
आनंदातले जगणे असताना
नकळत हे वार्धक्य येते,
अंथरुणावर खिळखिळे करत
जीवन अर्धे असेच जाते.
शरीरात असतो जेव्हा जोश
स्वप्ने अनेक पाहतात डोळ्यात,
वार्धक्य मात्र सारे संपवते
ओढताच आपल्या जाळ्यात.
अंथरूणच म्हणजे जग
अवघड असते जीवन जगणे,
ह्रदयात साठवून सारे दुःख
वरवरचे दिसते ओठांवरचे हसणे.
खचलेल्या त्या निष्पाप मनाला
आधार असतो फक्त शब्दांचा,
परावलंबी असते ते सारे जीवन
काय अर्थ अशा जगण्याचा.
क्षणक्षण जातो कठीणाचा
वार्धक्यात त्या गांजतांना,
शांत होतो जेव्हा देह
मृत्यूला त्या कवटाळतांना.