STORYMIRROR

Malati Semale

Inspirational

1.8  

Malati Semale

Inspirational

चिमणी आई

चिमणी आई

1 min
5.5K


इवल्या इवल्या चोचीने

घरटे बांधले इटूकले,

अंड्यातून बाहेर आली

पिल्ले तिची पिटूकली.

चिवचिवाट तो पिलांचा

हाक ती भूकेची,

दाणे पडण्या चोचीमध्ये

हाक आईला पिलांची.

ठेवून घरट्यात चिमुकल्यांना

भरारी घेते चोहीकडे,

एकेक दाणा टिपताना

जीव तिचा घरट्याकडे.

ऊन, वारा, पावसापासून

रक्षणार्थ उभी पिल्लांच्या

पंखात बळ येईपर्यंत

नजरेत चिमणी आईच्या.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational