STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

साठीच्या उंबरठ्यावर

साठीच्या उंबरठ्यावर

1 min
193

साठी बुद्धी नाठी आता

विसरायला हवं

साठीपलीकडचं जग

बघायला हवं


घरकामाच्या वर्तुळात

गोल गोल फिरले

आता मात्र मी

वर्तुळाला शिणले


आता जगायचंय

नव्याने मला

आधार द्यायचाय

अनेकांना मला


वृद्धाश्रमातल्या आजींना

वेळ काढून भेटायचंय

हलक्याफुलक्या गप्पांनी

त्यांना खुलवायचंय


निराधार अनाथांना

मदत करायचीय

निराधार महिलांना

साथ द्यायचीय


वाचायचंय ऐकायचंय

मनसोक्त भटकायचंय

वर्तुळाच्या परिघात

अगदी खूष राहायचंय


रेशमी बंध माझे

आहेत भावभरले

प्रेम माया वात्सल्य

विणीने सजलेले


बळ दे देवा मला

आधारभूत व्हायला

नव्या वळणावर

नव्याने जगायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational