करुया योगाची साधना
करुया योगाची साधना
आता सर्वत्र साधना
योगाचीच चालतसे
तन मन प्रफुल्लित
तयानेच रहातसे
पहाटेच्या रम्यकाली
करु योगाची साधना
लवचिक साधे तना
प्रफुल्लित करी मना
हास्ययोग संघ आता
हर एक गल्लोगल्ली
साधे हसत खेळत
आता काळजी विरली
समूहाने मोदभरे
होई शरीर साधना
जोम जोश तनामधे
नको व्यर्थ चिंता मना
मिळे तणावापासून
मुक्ती चुटकीसरशी
रोमरोमी हर्ष दाटे
दिनारंभी मनी खुशी
सान थोर सारे येती
योग साधना करती
आरोग्याचे वरदान
प्राप्त करुनी घेती
....................................
सौ. मनीषा आवेकर
पुणे
फोन 9763706200
.............................
