Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

काव्य चकोर

Abstract Others

4  

काव्य चकोर

Abstract Others

अतृप्त लाटा

अतृप्त लाटा

1 min
335


किनाऱ्यावर थडकणाऱ्या

असंख्य हिरव्या, पिवळ्या 

अतृप्त लाटांना थोपवणे 

जरा कठीणच जातंय मनाला..

अमर्याद उसळणाऱ्या याच लाटांनी

अथांगता दिलीय की उथळता?

हा प्रश्न भेडसावतोय उदात्त सागराला..!!


थोपवणे किनाऱ्याच्या हाती नाही

म्हणूनच कदाचित,

मन रुजवून अन् सामावून घेतंय

उधाणल्या प्रत्येक लाटेला..

गर्द झाल्या त्या हिरवाईला

अन हिरवाई नटल्या पिवळाईला सुद्धा

शीतलता प्रदान करून

पुन्हा परतवते आल्या वाटेला..!!


असंख्य स्मृतिपटलांचा 

हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास

कळत नाही,

उभारी देतोय का अधिक भग्न करतोय?

मनाच्या स्थितप्रज्ञ किनाऱ्याला..

सागराच्या खोलीचा 

अंदाज असेल का कोणाला..?

का किनाऱ्याच्या या गोष्टी

निव्वळ लागत असतील किनाऱ्याला..??


Rate this content
Log in