STORYMIRROR

Nitin Ghati

Abstract

4  

Nitin Ghati

Abstract

भेट

भेट

1 min
349

क्षणात अनोळखी मनाला

शहारणारी

अनोळखी नात काळजावर

बिंबवणारी...

कधी न व्यक्त होताही

सारे काही उमगलेली

तर कधी व्यक्त होऊनही

खूप विस्कटलेली

ती कुणासाठी जीवनाचा

एक विरंगुळा

तर कुणासाठी तुटलेले

नाते नवनिर्माणाचा काळ

ती कळली तर आठवणीतील

एक अविस्मरणीय क्षण

तर कधी नकळत झालेली

आयुष्यभराची आठवण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract