जग सुंदर दिसेल फक्त...
जग सुंदर दिसेल फक्त...
1 min
11.7K
आपण प्रेमात पडल पाहिजे....
जीवनात प्रवासात
ऊन सावलीच्या खेळात
क्षणोक्षणी बहरल पाहिजे
जग सुंदर दिसेल फक्त ...
नात्याचा विशाळ पहाडास
सहवासाच्या शुभ्र झऱ्याची
कडा मिळाली पाहिजे
जग सुंदर दिसेल फक्त....
वेळेच्या असिम चक्रात
मनालाही मनाची गती
समजली पाहिजे
जग सुंदर दिसेल फक...
काळाच्याही पडद्याआड
स्वतःच्या अस्तित्वाची
एक मधुर कहाणी
अजरामर केली पाहिजे
जग सुंदर दिसेल फक्त
आपण प्रेमात पडल पाहिजे....
