शब्दसाधना
शब्दसाधना
1 min
253
शब्द असतात वेंधळे
करतात नकळत घात क्षणाचा
फुटते मनालाही पाझर जेव्हा
होतो शब्दरूपी संवाद प्रेमाचा
भावना होतात अनावर
जेव्हा शब्द होतात उग्र
त्रास त्याक्षणी होतो त्याचा
जे करतात आघात शस्त्ररूपी मनावर
शब्द होतात सूर ही
नाळ जुळलं जेव्हा मनाशी
शब्द होतात बेसुरही
द्वंद्व करतात जेव्हा नात्यांशी
शब्दांचा हा खेळ सारा
घडतो मनात क्षणाक्षणाला
उमटतात मग पडसाद ही
तयाचे मेळ घालत भावनेला
शब्द होतात सार ही
केली जाते जेव्हा शब्दांची उपासना
भेटते तयांना मूर्तरूप
पूर्ण होते तेव्हा काव्य साहित्याची
"शब्दसाधना"....
