तो रक्षक लढतो आहे....
तो रक्षक लढतो आहे....
1 min
23.8K
भान सारे विसरून जीवाचे
कार्य खडतर प्राणपणाचे
निरंतर साद स्वरक्षणाची देतोय
तो रक्षक लढतो आहे...
प्रसंगी तुकडा काळजाचा
इमान राखण्या मातीचा
दूर करून स्वतः जळतोय
तो रक्षक लढतो आहे...
गर्द काळे संकट विषाणूंचे
दूर सारण्या स्वराज्यावरचे
प्रसंगी वार आप्तजनाचा झेलतोय
तो रक्षक लढतो आहे...
गहरे संकट देशावरती
भ्रांत नसे खळगी भरण्याची
तरीही तो दिनांचे पोट भरतोय
तो रक्षक लढतो आहे...
मात करण्या गहन संकटी
पुन्हा निर्मिण्या राष्ट्रप्रचिती
साथ आपल्या मदतीची मागतोय
तो रक्षक लढतो आहे...
