तुझ्या परत पुन्हा येण्याने..
तुझ्या परत पुन्हा येण्याने..
1 min
442
तुझ्या परत पुन्हा येण्याने
होताय बदल माझ्या जगात
रोज भेटायला लागलोय
स्वतःला परत त्या जुन्या रूपात
लागलाय छंद मला तोच जुना
उतरताय माझ्या भावना
शब्दरूपात कागदावर पुनः पुन्हा
होतोय स्वतःशी माझा
संवाद रोज नव्या रूपाने
घडताय बदल मग जीवनात
नित्य होणाऱ्या संवादाने
रुजतेय बी परत जुन्या
नाते रुपी रोपट्याची
भेटतेय जोड होतेय वाढ
न भेटताही याच वृक्षाची
होतोय प्रयत्न मग
दोघां कडूनही
जुन्या कडू आठवणी
मिटवून नाते फुलविण्याचा
बहरतोय वृक्ष आता वाळवी
लागलेला तोच आयुष्याचा
घडतोय प्रवास नात्याचा
ठेव विश्वास होईल प्रवास सुखाचा
