STORYMIRROR

Nitin Ghati

Others

4  

Nitin Ghati

Others

हास्याची बात निराळी

हास्याची बात निराळी

1 min
144

हास्याची बात निराळी 

कहाणी सुरू ती जन्मवेळी 

असे सभोवती नाती फार

शिशु हास्याची बातच और 

          घडतो बदल शरीरस्वास्थ्यत

          पाऊल पडते कुमारावस्थेत

          सुरू खेळ मग सामर्थ्याचा

          हास्य होते मार्ग यशाचा

येता वय मग तरुणपणी

कहाणीत बदल तव क्षणोक्षणी

सुंदर हास्याचा पडतो प्रभाव 

प्रेमाच्या नात्याचा लागतो निभाव

         येते कहाणी मध्यवस्थेत

       नात्यांची कसोटी घेत कक्षेत

       झेलत सांसारिक बोजवारा

       हास्य बनते फक्त मार्मिक तऱ्हा

जीवनाचा हा खेळ सारा

प्रत्येक वळणावर मेळ बरा

हास्य देते साथ वेळोवेळी

जगण्याची ही कलाच निराळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन