गुरूमाऊली
गुरूमाऊली
गुरू, आमची माऊली,
गुरू , अश्वस्थ सावली !
गुरू , झोळी भरलेली,
गुरू , ज्ञानाची भुकेली !!
गुरू, आहे एक स्रोत,
गुरू , घुंटी ज्ञानामृत!
गुरू कर्म, अखंडीत,
गुरू रमती, शिष्यात !!
गुरू, एक तरूवर ,
गुरू, ज्ञानाचा सागर !
गुरू, भरली घागर,
गुरू घालती, संस्कार !!
गुरू, आपले दर्पण,
गुरू, करी परिक्षण!
गुरू, करावे स्मरण,
गुरू देव तो सगुण !!
गुरू, करूणासागर !
गुरू, परम ईश्वर !
गुरू , देती ती आधार,
गुरू, एक शिल्पकार !!