ओढ तुझी लागली
ओढ तुझी लागली
ओढ तुझी,
मज, लागली मातृभूमी !
प्रिय, मातृभूमी !
प्राणांहुनी !!1
स्वर्गादपि, सुंदर,
रूप, असे देखणे!
तुझे, तराणे !
गायचे !!2
वारंवार, जन्म,
भूवरी, याची मिळावा!
इथे, विसावा!
कायमचा !!3
वरती, हिमालय,
भूमी, सागरांनी वेढली!
नररत्ने, जन्मली !
मातीतूनी !!4
प्रिय, जन्मभूमी,
सर्वांना, ओढ तुझी!
जीवनी, माझी !
तुझ्याचसाठी !!5
धनधान्य, संपत्ती,
फुलली, लोक संस्कृती!
गुंग, मती !
देवदेवतांची !!6
ओढ, तुझी,
वीरांना, होती केवढी!
गडकिल्ले, गढी!
आठवणी !!7