STORYMIRROR

Anil Chandak

Others

4  

Anil Chandak

Others

नमन तुमच्या स्मृतीला

नमन तुमच्या स्मृतीला

1 min
334

ज्ञात,अज्ञात असंख्य देशभक्तांनी,

कारावास पत्करला..

१८५७ चे पासून हा यज्ञ तेवत राहिला...

पंथ, धर्म, प्रांत विसरूनी,

एकदिलाने लढा दिला..


कित्येक फासांवरी चढले,

नाही चिरा पणती त्यांच्या नशिबाला...


असंख्य समाजसेवकांनी,

सामाजिक सुधारणा, अंधश्रध्दा,

मुक्तिसाठी जीवन अर्पिले..


संतांनी पुर्वीपासून या देशाला,

आध्यात्मिक रस्ता दाखविला,

सहिष्णुभाव या देशाचा आत्मा राहिला...



असहकार,विलायती मालावर ,

बहिष्कार,

दांडीयात्रेने स्वाभिमान वाढविला..

भूदानाने देशभक्ती जागविली..


अनेकांनी व्यक्तिगत, कुणी संघटीतपणे, देशसेवेत झोकून दिले,

कुणी अहिंसेचा मार्ग पत्करला,

कुणी सशस्र होऊन ही लढा दिला..


रस्ते वेगवेगळे होते,

लक्ष्य स्वातंत्र्य प्राप्तीचेच होते..


जाता जाता इंग्रजांनी,

या देशाची,छकले केली,

भयानक रक्तपात, या देशाने अनुभवला...


भिमराव आंबेडकरांनी, संविधानाला अधिष्ठान दिले,

देश प्रजासत्ताक केला..

दिनदलितांना वंचीतांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली...

वल्लभभाईंनी संस्थाने विलीन केली,

सारा देश, एका सुत्रात बांधला..।


पंचवार्षिक योजनानी देशाला,

स्थैर्य दिले,

धरणांनी हरितक्रांती घडवून आणली...


लोकशाहीने, औद्योगिक क्रांती,

घडविली,



दुग्धक्रांती,सहकाराने,

शेतकऱ्याचे जीवनस्तर उंचावला..

शिक्षणांने महिला उंबरठा सोडून,

काम करू लागल्या...


विक्रम भाभा,अब्दुल कलामांनी,

संरक्षण सिध्दता बळकट केली..

सैनिकांनी संरक्षणासाठी प्राण वेचून,शहीदी पत्करली..



कितीतरी जणांचा हात हा ,

देश घडविण्यात लागला,

कुण्यां एकाचा,वा घराण्याचा नव्हे...


प्रजासत्ताक दिनाला या,

सर्वांना आठविणे कर्तव्य आपले,

तिरंग्याला नमन करतांना,

या सर्वाच्या कार्यांचा गौरव,

जयघोष ही झाला पाहिजे........


ज्यांनी देश घडविला,

त्या सर्व ज्ञात अज्ञात,

सर्व महापुरूष,क्रांतीकारांना,

शतश: नमन.....


Rate this content
Log in