प्रेमरंग उधळता
प्रेमरंग उधळता
प्रेमा तुझा रंग कसा, हृदयाला भावणारा,
रंग प्रणय खुलवीत, छटा उधळणारा!!1!!
प्रेम रंग उधळता, मन स्वर्गी विचरते,
काम ज्वर चढताची, मन धुंदफुंद होते!!2!!
झोके, ते हिंदोळ्यावरी, भावनांना उमटत,
हृदयाला झंकारत, राग आलाप छेडत!!3!!
प्रेम करणाऱ्याचे, विश्वच वेगळे असते,
वास्तवाचे भाव नसे, स्वप्न रंजनी रमते!!4!!
मैत्र रंग ते वेगळे, प्रेम सखी कुंजनात,
पत्नी सर्वस्वाचे दान, देते पूर्ण जीवनात!!5!!
कधी, वात्सल्याचा रंग, माता अन लेकराचा,
एक दुसऱ्याच्या साठी, प्रेम भाव आधाराचा!!6!!
प्रेम, बंधुत्वाचा धागा, एका माळेत गुंफत,
सर्व देशवासीयात, राष्ट्रभक्ती जागवित!!7!!
रंग लागता एकदा, वेडा पुरता दिवाना,
काव्य स्फुरते तयाला, उत्स्फुर्त मारी तो ताना!!8!!
रंग चढता एकदा, डाग पुसता पुसेना,
विरहाच्या त्या वेदना, गळ अश्रुची थांबेना!!9!!
रंग आहे, कितीतरी, रंगछटा अगणित,
प्रेमबंध रेशमाचे, धागे भाऊ-बहिणीत!!10!!
सात रंगाच्या स्वप्नात, सप्तसुर छेडणारा,
विश्वासाचा एक धागा, प्रेमरज्जु जोडणारा!!11!!

