भरा संसारी आनंद
भरा संसारी आनंद


फेरे मारूनी, अग्निला,
बंधनात, अडकती!
सात वचने देऊनी,
पती-पत्नी मिरविती!!1!!
सर्व टाकती अक्षदा,
सारे आशीर्वाद देती!
हात गुंफले दोघांचे,
अग्निभोवती चालती!!2!!
गाठी, लग्नाच्या बांधल्या,
गेल्या खरी स्वर्गातची!
पती-पत्नी, दोघे जण,
चाके, संसार रथाची!!3!!
आयुष्याची इमारत,
उभी विश्वासावरती!
वैवाहिक बंधनाचे,
सौख्य, त्यामध्ये असती!!4!!
लग्न, विवाह बंधन,
कुटूंबसंस्थेचे, हित!
आहे,&n
bsp;त्यावरती उभी,
नवी पिढी, भविष्यात!!5!!
माहेराला सोडुनिया,
येते कन्या ती सासरी!
दोन्ही कुलाच्या सौख्याला,
जपे आजन्म अंतरी!!6!!
समजूनी, उमजूनी,
वाट चाला आयुष्याची!
सुख-दु:खाचे सोबती,
गाठ बांधा कर्तव्याची!!7!!
सारीपाट जीवनाचा,
नांदा, सुखाच्या सागरी!
व्हावे घराचे मंदिर,
भरा आनंद संसारी!!8!!
नवनिर्माण कंकण,
स्वप्न, आकांक्षा घागरी!
जाण ठेवा संस्कारांची,
स्वर्गसुख आणा घरी!!9!!