भयावह त्या सावल्या
भयावह त्या सावल्या
होती अबोध बालिका,
जाण, तिजला नव्हती !
हाती, टेडीला घेऊनी,
घरी, परतत होती !!1
वासनेच्या,जंगलात,
सोकावले, ते लांडगे !
भक्ष्य जाळ्यात ओढण्या,
नराधम,लागे मागे !!2
किती निष्पाप बालिका,
तिचे,दिस खेळण्याचे !
वासनांच्या,डोहातले
खेळ, ते स्वैराचाराचे !!3
भयावह,त्या सावल्या,
भय, पाश आवळती !
चाळे, ,छिपाक,छिचोरे,
बळी, बालिकांचे घेती !!4
रोज कितीतरी कळ्या,
इथे,कुस्करल्या जाती !
किती,एक निर्भयांची
अब्रु,पणाला लागती !!6
अँसीडाचा, करी मारा,
कुणी, पेट्रोल फेकती!
निरागस, स्री देहाचे,
धिंडवडे, ती काढती !!7
आता कसा ह़ो धरावा,
इथे, कुणाचा भरोसा !
नाते, संबंध तुटले,
तोडी वासना, विश्वासा !!8
भाषा, करी, स्रीमुक्तीची ,
वृत्ती, लाजवी सैताना !
आम्ही, सुधारलो म्हणे,
किती, घोर विटंबना !!9