चिरा पणती ही नाही
चिरा पणती ही नाही
ज्योत क्रांतीची तेवण्यां !
ठेवी घरांदारी टाच ! !
आयुष्यांची केली होळी!
कुटूंबाला बसे आंच!! 1
नाही जीवनांची पर्वा !
हाती बेड्या दोरखंड!!
बलीदानी वीर असे!
झाले चकीत त्रिखंड!!2
स्वातंत्र्याचा लढा घोर !
भारतीय एक होती!!
अत्याचारी दमणाला!
प्रतिकार ती करती !!3
लक्ष्मीबाई खुदीराम !
पांडे, सुभाष भगत !!
सुखदेव तात्या टोपे!
पेटविली क्रांती ज्योत!!4
दूष्ट फिरंगी अन्याये!
दंड क्रांतीकारकांसी !!
काळेपाणी जन्मठेप !
सजा भोगण्यां तयांसी !!5
किती फासांवरी गेले !
त्यांची गणतीच नाही!!
अश्रु ढाळणे राहुद्या!
चिरा पणतीही नाही!! 6