Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Chandak

Others

3  

Anil Chandak

Others

जगुया आयुष्य चांगले

जगुया आयुष्य चांगले

1 min
292


नव्या वर्षाच्या,संकल्पावर ठेवा ध्यान,आयुष्याचं होईल कल्याण,


कल्याण नियम बाळगणाऱ्याचा, अन जीवनी आचरणात ठेवूनी!


ठेवूनी ध्येय डोळ्यासमोर मोठे, स्वप्न ते वास्तवात उतरावे,


उतरावे मनोनिग्रहाने ठामपणे, मनांत संयम बाळगूनी!! 1


बाळगूनी ओझे गतवर्षाचे,होतो जीवाला त्रास,भोगतांना दु:ख,


दु:ख जरी आले वाट्याला,काही सुखाचे क्षण ही होतेना आनंदाचे !


आनंदाचे क्षण जरी कमी जास्त झाले,तरी कुरकुर कां करता,


करता येईल तितके थोडेच आहे,येईल त्याला भोगावयाचे !! 2



भोगावयाचे प्राक्तन, आले नशिबात,तरी संकल्प सिध्दी करावी,


करावी आपल्या आयुष्यात,बदल घडवित,होण्या आपले भले!


भले मग तूमच्या सोबती,लोकांच्या मदतीचा हात असे वा नसे ,


नसे ना काही आधार,मुक्तपणे जगण्या, आपले आयुष्य चांगले !! 3



Rate this content
Log in