STORYMIRROR

Anil Chandak

Classics

3  

Anil Chandak

Classics

माय मराठी भाषा

माय मराठी भाषा

1 min
184

माय मराठी,श्रेष्ठ जगी,लडीवाळ बोली!

जतन करूया भाषेचे,संस्कृती अपुली !!1


अलंकार, व्याकरणे सजली ज्ञानेश्वरी!

श्रेष्ठ साहित्य जननी,लिपी देवनागरी!!2


महाराष्ट्रभूचा, कणखर बाणा करारी!

त्याग बलीदान ,रोमांच फुलविणारी!!3


संतांच्या लेखणीतूनी,अध्यात्म्याचे दर्शन!

जात भेद ना,होते हरीनामाचे गर्जन!!4


साहित्यक झाले,एकाहुनी एक सरस!

अक्षरगंगा,बुध्दीदायी,प्रेरक,ओज्वस!!5


मातीचा गुण,लागे बारा,कोसावर हीला!

अमृतापरी गोड लागे नवरस प्याला!!6


गडकिल्ले कर्तृत्व शिवरायांचे,दाखवी!

शंभुरायांचा त्याग, क्रुर शत्रुला नमवी!!7


पानिपत रणावरी,पाने इतिहासाची!

बलीदानाची कथा,घनघोर संग्रामाची!!8


साऱ्या जगात होतो जिचा गौरव सन्मान!

मराठी राष्ट्रभाषा,आम्हा सार्थ अभिमान !!9


भाषेत वसे,मानवतेचा रसाळ गाभा!

माय मराठी किर्ती,पसरे सर्वत्र आभा!!10


शब्दमाधुर्य,भाव मुग्धा,सौंदर्य दर्पिणी !

लवचिक,नम्र बोली,अर्थपूर्ण देखणी !!11


चौसष्ठ कलांनी सजले,जीवन दर्शन!

जगी डंका वाजतो,"अनिल" करी नमन!!12



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics