STORYMIRROR

Mina Shelke

Abstract Classics Inspirational

4  

Mina Shelke

Abstract Classics Inspirational

कसे सांगू तुला

कसे सांगू तुला

1 min
26.1K


कसे सांगू तुला......१

जन्म हवा मला

इवल्या जीवाला

मायेचा ग झुला


गर्भित मी कळी.....२

देते आई हाळी

नको ग अवेळी

करु माझी होळी


नऊमास पूर्ण......३

जप मला कुशी

का ग वाटते मी !

सर्वांना नकुशी ?


मलाही पाहू दे.....४

ही दुनियादारी

कळूदे जगाला

कमी नाही नारी


तुझी इच्छापूर्ती .....५

करेन मी सारी

यशाचा दाटेल

अभिमान उरी


मुलगा, मुलगी.....६

विचार हा खोटा

कर्तृत्वाने माझ्या

मिटेल हा तंटा


साद ही प्रेमाची.....७

लागूदे जिव्हारी

कर आता माझ्या

जन्माची तयारी....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract