Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

दर्शन जोशी

Abstract

3  

दर्शन जोशी

Abstract

आरोग्याचे अक्षयदान

आरोग्याचे अक्षयदान

1 min
240


अक्षयदान देऊनी आम्हां

द्यावा मरणावरती विजय

हे शंकरा ज्योतिर्लिंगा

भवभयतारक मृत्युंजय !


धन्वंतरी मिळोत आम्हां

संजीवनी खरी मिळो 

हे हनुमंता तुझ्या प्रतापे

कोरोनाचे विघ्न पळो !


सूर्यनारायणा करतो अर्पण

अर्घ्य म्हणूनी पंचप्राण 

प्रसाद म्हणूनी द्यावे आम्हां

आरोग्याचे अक्षयदान !


हे अंबे हे भक्तवत्सले 

महाविष्णूची माया तू

जगच्चालिके आज आम्हांला

द्यावी सुंदर काया तू !


हे लंबोदर गजवदना तू

निवार संकट आले महान

दे रोगाच्या प्रतिकाराला

आरोग्याचे अक्षयदान !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract