STORYMIRROR

दर्शन जोशी

Tragedy

3  

दर्शन जोशी

Tragedy

माहेर

माहेर

1 min
323

लेक चालली चालली 

आज घराच्या बाहेर

डोळे पुसून बोलते

"आज सोडते माहेर !"


कोणी केले रुखवत, 

कोणी केला गं आहेर.

तूपसाखरेचे लाडू, 

किलो आत पावशेर !


करवली सोबतीला, 

बोले तोडूनिया घेर.

"लांब जायाचे आम्हांला, 

करु नका आम्हां देर !"


पुसू नका दिली कोठे

तिचे गाव संगमनेर !

डोळे पुसून बोलते

"चला ! सोडते माहेर !"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy