आला उन्हाळा
आला उन्हाळा
1 min
336
वसंत सरला ग्रीष्मही गेला
घाम गळतो किती घळाळा !
वैशाख वणवा जीव जाळतो
आला गडे उन्हाळा !
रखरखीत ही धरणीमाता
तहानलेली पशू पाखरे
म्लान जाहली जनता
आणि काळवंडलेली घरे !
पाणी आटले जलसाठ्याचे
तुटवडा घरोघरी
महिला जाती पाण्यासाठी
मैलामैलांवरी !
वाट पाहतो जलधारेची
पाणी वाहेल हो खळाळा !
आगंतुक पाहुणा नकोनकोसा
आला बरे उन्हाळा !