पाऊस
पाऊस
झालाच प्रेमभंग , कंठ दाटलेला,
डोळ्यांत त्या स्मृतीचा, पाऊस साठलेला !
नि:शब्द होती गात्रे, वाराही थांबलेला,
स्तब्ध पाखरे ती , शब्द गोठलेला !
शांत शांत होतो , नव्हतेच भान मजला ,
क्षितीजाला पहात होतो , सूर्य अस्तास चाललेला !
प्रेमाला आळवित होतो, म्हणतो सुखद क्षणाला
अपराध केला काय ? आरोप काय झाला ?
प्रेमाचा नवा फुलोरा , कोठे उडून गेला ?
प्रयत्न व्यर्थ सारे , पश्चात्ताप पावसाला !