तू
तू
पहाट होता पाकळीवरती
चमचम करी त्या दवात तू
धरणीला जी उजळत आली
कोवळ्या रवी किरणांतही तू
येतो श्रावण, भिजवी तनमन
सर बरसे त्या नभात तू
गोजिरवाणी फुले डोलती
रंगातील बहरातही तू
श्वासातून ज्या सुगंध भरती
वार्याच्या लहरीतही तू
सळसळ पानी कुजबूज कानी
उठते वादळ त्यातही तू
बावरते मन पाहूनी तुजला
अन् हरवे त्या क्षणात तू
रात्र जाहली निद्राधीन तनू
सर्वव्यापी स्वप्नातही तू.

