गजल
गजल
ये सखे साजणी, शब्द पाळून ये!
पापणी लावतो, स्वप्न होऊन ये !
भेट झाली जिथे ,मी तिथे सांडलो;
भर जरा ओंजळी गंध माळून ये !
परतली पाखरे, सांज बोलावते ;
रंग साती तिला दान देऊन ये !
मी किती ढाळले, टीप डोळ्यातुनी!
दवरुपी थेंब ते, तूच मोजून ये !
का कधी हे सखे, ध्यान राहील का !
हरवलो मी जरी, भान होऊन ये !
आजही वाटते, तू जशिच्या तशी;
बघ पुनव चालली ,चंद्र पाहून ये !