पाऊस भेटीचा
पाऊस भेटीचा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
तुझ्या माझ्या भेटीचा
पाऊस आज पडला....
मोर होऊनी समुद्र
अंगणी तुझ्या नाचला....
छंद तुला बघण्याचा
सरी होऊन बरसला....
ओलाचिंब करून तो
केसात तुझ्या रमला....
रोमरोम जणू भयाचा
स्पर्श मोहून गेला....
कातरवेळी हळुवार
मिठीत तुझ्या जाणवला...
तुझ्या माझ्या नात्याचा
अर्थ त्याला भावला...
थंडीतही आज तो
भेटीस आपल्या आला....
(१३/१२/२०१४ रा.८:०० )