व्हायचं आहे पाऊस मला
व्हायचं आहे पाऊस मला
1 min
28.1K
व्हायचं आहे पाऊस मला
भावनांच्या नभातून एकदा
मुसळधार बरसायचं मला
खूप आहे हौस
काळोखात शांत एकदा
रिमझिम कोसळायचं मला
विजांचा कडकडाट
काळजात भोगायचा एकदा
स्फुर्त प्रकाशित व्हायचंय मला
व्हायचं आहे आनंद मला
पाऊस होऊन पाणी एकदा
स्वत:च करायचं आहे मला
२२-०६-२०१६ | १०.१० वा. सकाळी.
