STORYMIRROR

Anonymous None

Romance Abstract Others

3  

Anonymous None

Romance Abstract Others

रोजच यावी रात्र अशी

रोजच यावी रात्र अशी

1 min
14.9K


रोजच यावी रात्र अशी 

मांडीवर प्रिया अवचित निजावी...

हररोज घडावी प्रीत अशी 

कळी माझी अलगद फुलावी.... 

रूपवान तिची बावनकशी 

सूवर्णपीत चंद्राने रोज पहावी...

अलंकाराची तिची बहुराशी 

रात्रीसवे माझिया पांघरावी....

रंगावा विडा जणू बनारसी

ओष्ठसुमने नयनिं भरावी...

नयनकमल मिटूनी जशी 

परी निजलेली मनी साठवावी....

दुर्मिळ कस्तुरी रसरसी 

सुगंधात सारी रात नहावी...

रातराणीच्या शय्यानिशी 

प्रीत तुझ्यासवे रोज खुलावी......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance