षोडस कलासंपन्न
षोडस कलासंपन्न
षोडस कलासंपन्न
ओष्ठकळ्या कोरीव
किमया नक्षीदार
मंजुळ बोल तुझे...
अंतरंग दृष्यरूप
रुधिराचे तयांना
सप्तरंगीत भाव
चंद्रकोर ओठ तुझे.
हर्षित कधी ते
तर अबोल कधी
क्षण हरेक भासे
स्पंदन ओठ तुझे.
मिठीत तुझ्या
आभाळ प्रीत
स्पर्श क्षितिजाचा
ओठ तुझे.”