Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Anonymous None

Romance


2  

Anonymous None

Romance


लाखातून घडावे शिल्प एखादे

लाखातून घडावे शिल्प एखादे

1 min 6.7K 1 min 6.7K

लाखातून घडावे शिल्प एखादे

तसे डोळे तुझे घडले आहेत. 

दुर्मिळ असा पडावा एक थेंब

शिंपल्यात मोती सजले आहेत.

मंजुळ उमटावे गीत ओठी 

सप्तसूर डोळ्यात जुळले आहे.

सूर छेडावे तारेतून बोटांनी

मैफिलीत डोळे गायिले आहे.

मेघ गर्जुनी आसमंतात

मोर डोळ्यात नाचले आहे.

अबोल धरणीला स्पर्शून थेंब

सरींसवे डोळ्यातून वाहिले आहे.

शब्दसुमने सारी एकवटून

डोळ्यात काव्य रचले आहे. 

स्वप्न हृदयीचे तुझ्यासवे

डोळ्यात तुझ्या पाहिले आहे


Rate this content
Log in

More marathi poem from Anonymous None

Similar marathi poem from Romance