STORYMIRROR

Anonymous None

Romance

2  

Anonymous None

Romance

रात्रीचा प्रगाढ एकांत

रात्रीचा प्रगाढ एकांत

1 min
2.9K


रात्रीचा प्रगाढ एकांत

एकांतातील मी एकटा.

सुन्न-मन सुन्न-भावना

सुप्ततेतील मी एकटा.

कशी रात्र सरेल ही

कसाबसा झोपेन एकटा.

कसा लागेल डोळा

क्षण तुझ्याविना एकटा.

वाट संपेल कशी आता.

चालेन कसा मी एकटा.

डोळे खुपू लागले स्वप्नांनी

अंधारात असेन मी एकटा.

आयुष्य लाभावे माझे तुला

त्याचे काय करू मी एकटा.

संकल्प सारे माझे अर्पण तुला

पूर्ण कसे करू त्यांना मी एकटा.!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance