ओढ पावसाची
ओढ पावसाची


पाऊस तुला भावणारा
पहिला वहिला असतो
गंध मातीचा दरवळणारा
उल्हास मनाला करतो
थेंबाथेंबात तुला स्पर्शणारा
गारवा शहारून देतो
तुला फुलविणारा वारा
भावूक हृदयाला करतो
तुला ओलाचिंब करणारा
पाऊस भरभरून पडतो
हर्ष तुझा द्विगुणित करून
मनमीत तुझा भासतो
तुझ्या माझ्या ओढीचा
पाऊस रोज पडतो...
मोर होऊनी समुद्र
अंगणी तुझ्या नाचतो...