STORYMIRROR

Anonymous None

Others Inspirational

3  

Anonymous None

Others Inspirational

मरावे परी प्रकाशरुपी उरावे

मरावे परी प्रकाशरुपी उरावे

1 min
28.1K


मरावे परी प्रकाशरुपी उरावे...

दिप प्रज्वलित होउनी

अंधकाराला भेदूनि टाकिले

मनी एक काहूर माजवूनि

जगण्याचे नवे वर्म गाईले....

दिव्यासवे वात गुंफली

तैलसाथीने जळू लागली

प्रकाश सर्वत्र उधळून

जगण्याची रीत स्फुरू घातली...

तप्त काजळात तप्त संवेदना

तरीही मनी प्रांजळ भावना

उद्देश असे किती शहाणा

नसे मुळीच कुठला बहाणा....

ज्वाला उधळून देहाच्या

प्रकाशी जन्म देऊ घातला

कंठ भरुनी दिव्याचा

विरहगीत आळवू लागला....

अंश अंश संपवूनी वातीने 

मृत्यूला स्वमुखें आधीन करावे

दिव्यानेही मरणशय्या बनुनी

तटस्थ कर्तव्य बजवावे...

समजूत घालुनी दिव्याची

वातीने मार्गस्थ व्हावे

देव्हाऱ्यात साक्ष देवाची

मरावे परी प्रकाशरुपी उरावे,

प्रकाशरुपी उरावे... 

१२ जाने २०१२ (दुपारी १२.३० ते २.३० दरम्यान)


Rate this content
Log in