STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

5.0  

Varsha Shidore

Romance

माय बाप नि मी...

माय बाप नि मी...

1 min
424

हाकेत गोडवा अति मायेचा

माय माझी बहू काळजीची

दटावण्यात कटुता हक्काची

बाप माझा सारथी आयुष्याचा


प्रेम देणं विडा कायमचा

माय माझी रडकी बोलकी

कर्तव्य जपणारा पालनहार

बाप माझा निरंतर साथीदार


जगवणारी शिदोरी संस्काराची

माय माझी मूर्तिकार घडवणारी

जबाबदारीचं ओझं पेलणारा

बाप माझा मार्गदर्शनकार


कुशीत हिमतीने विसावा देणारी

माय माझी सावित्री तारणारी 

रक्षणकर्ता आधाराची सावली

बाप माझा खंबीर वटवृक्ष


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance