भावविश्वाचे कमलपुष्प तू
भावविश्वाचे कमलपुष्प तू


भावविश्वाचे कमलपुष्प तू
अर्थ एक एक पाकळी तू...
अंतरंगांचे सुरेख मिलन तू
भ्रमराची आंतरिक ओढ तू...
जलाशय देहबोली तुझी
प्रफुल्लीत तरंग ओठी तुझ्या...
नयनी ओला स्पर्श तुझा
पापण्यात जणू प्राणच तुझ्या...
मन भव्य आभाळ तुझे
पाऊस थेंबातून बरसतेस तू...
उपकृत करून धरणीला
तृप्त प्रशांत करतेस तू.....
सागराची न गवसलेली
अमर्याद खोली तू....
निसर्गाची अभूतपूर्व
एकमेव प्रिय किमया तू....
२२-१२-२०१४ : सकाळी ११:१५ वा