तुला आठवतं का ग ?
तुला आठवतं का ग ?
तुला आठवतं का ग ? तू माझ्या घरी आली होतीस
नजरा - नजर होता तू लाजून चूर झाली होतीस...
तू कशाला आठवशील आता जीवघेणा भूतकाळ
काळाबरोबर बदललं पाहिजे रे तू नेहमी म्हणायचीस ..
खरं सांगू ...मी नाहीच बदलू शकलो स्वतःला
म्हणून तर मी भरकटलो ... दिशाहीन झालो ...
तू भले काहीही समज पण नाहीच विसरू शकत तुला
तू दिलेल्या त्या हळव्या क्षणांना अन जखमांनाही ...
तू जेव्हा हसतेस ना जणू मोतीच उधळतेस
आकाशातला चंद्रही झुरतो तुला पाहताना ...
तुझं हसणं , बोलणं सर्वकाही विलक्षण
बेधुंद होऊन जातो मी तुला न्याहाळताना ...
तुझं असणं - नसणं माझ्यासाठी क्लेशदायकच
तुझा सहवास हवाहवासा तसा विरहही जीवघेणा ...
घर भरल्यागत वाटायचं ...तू होतीस तेव्हा ...
ते नाजूक स्नेहबंध आठवतात , तू नाहीस तरीही ...
माझ्या आयुष्यातून तू गेलीस, पण... मनातून कसं घालवू ?
अंतीरीच्या आठवणींच्या दिव्यांना तूच सांग कसे मालवू ?
तू इथेच कुठे तरी असल्याची भासतेस.मला पावला- पावलावर ...
तुझी शपथ मी रडून घेतो मनसोक्त आठवण तुझी आल्यावर ....