बोला... धन्यवाद विश्वगुरुजी
बोला... धन्यवाद विश्वगुरुजी
आली लहर केला कहर
काहीही करू आमची मर्जी
आम्ही चेले गडे दिवाने
लै हुशार आमचा गुर्जी
आली लहर केला कहर
तुम्ही म्हणता असेल खरेही
सगळं काही ठरल्याप्रमाणे
बेमतलब नाही घडत काहीही
आली लहर केला कहर
बेमौसम नाहीच बहर कधीही
कधी कळणार तुम्हाला राजेहो
आमच्या सारखे आम्हीच असू
आली लहर केला कहर
रात्रंदिनी डंका शामप्रहर
थापाड्याचं शेतात बारा औत
बघता तिथे एकही नव्हत
आली लहर केला कहर
तुमच्या बा च काय गेलं ?
झाली असेल थोडी विक्री-बिक्री
देशहितासाठी बाबानो लै जरुरी
आली लहर केला कहर म्हणता
खुशाल लाज नाही वाटत ?
हाडाची काड केल्याबिगर
विकास नसतो भेटत
आली लहर केला कहर
कुठे कोण उपाशी झोपतो
आले काळेधन , मन प्रसन्न
बोला... धन्यवाद विश्वगुरुजी
