शेतकरी
शेतकरी
भाव विश्व तयार झाले
निशब्द तेच सरकार आले
भूई साखरेचे भाव नागरीस आले
सत्ताधारी मस्तीत आले
विडंबना ही मोलमजुरी ची
दयनीय अवस्था शेतकऱ्यांची
पिके उभी करपलीं जाते
पीक अळ्या नी भरून येते
दुष्काळ साथ सोडत नाही
बैलशिवाय नांगर ओढत नाही
नुकसान आमुचा डोळ्यांत वाहे
महागाई आमची परीक्षा पाहे
भाव नसला तर उभ पीक आम्ही जाळतो
गावचे आम्ही मिळून मिसळून राहतो
धार्मिक कामात असले नसले सगळे वाहतो
वरती कर्ता धरता आमुचा आम्ही त्यास पाहतो ....