STORYMIRROR

rahul gawande

Inspirational Others

0.2  

rahul gawande

Inspirational Others

बेरोजगार बनू नको

बेरोजगार बनू नको

1 min
2.0K


काय दयनीय अवस्था

माझ्या मित्र, भावाची

काय कसले शिक्षण

अन् डिग्री फक्त नावाची ...!


उठ की आता तरी

शिक्षण झाला गोरख धंदा

मोठ्या- मोठ्या धनिकांंचा

फक्त पैसा कमाई फंडा ....!


अरे नको बेकारी ठेवू

मिळेल तो उद्योग कर

स्वः मालक होऊन

नवीन क्रांती युवावर्गच्या नावे कर ...!


मराठी जनाधार का कोसळलाय

या बेकारीच्या लाटेवर

मिळेल तो उद्योग अन्

बस नौकरशाहीच्या छातीवर ...!


तू खरा शिल्पकार

तुझ्यावर संसार आणि हा समाज

तु उद्योजक होऊनी

कर हूकूमशाही या नायनाट ...!


बेकारीने खचू नको

उलट, सुलट मार्ग धरू नको

मिळेल ते काम करुनी

स्वाभिमानाने जग, कधी लाचारी पत्करू नको .....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational