माय राबते सतत
माय राबते सतत

1 min

21K
माय राबते सतत,राबण्याचं तीचं लेणं
स्वत: झुरून, मनाला मारून ,शिळ्या तुकड्यावरच जीणं !ध्रू!
कष्टाने फुलवते, मायेनं खुलवते
चटणी भाकरीचा संसार, माय ईमानानं चालवते
स्वाभिमानाचं ईमान तीचं नकाे फुकटचं घेणं !१!
माय जगवते, माय शिकवते
आतडं फाडून स्वतःच, माय मातीतून उगवते
उगवणचं तीचं काम, कर्म तीचं जन्म देणं !२!
Advertisement
stify">जगणं जमवते, राबणं उमलते
दुःख लपवून स्वतःच, माय घरादाराला हसवते
हसवण्याचाच तीचा ठेका, क्षणाेक्षणीचं मरणं !३!
जन्मभर जळते, सडा मायेचा सांडते
विखुरलेल्या पाखरांना बळ एकिचचं पाजते
मायेच्या एका हाकेनेच व्हयी, मया पाेटाचं भरणं !४!
तिच्या काबाडकष्टातून, देई कामाचा संदेश
तिच्या मयाळू बाेलण्यातून, देई प्रेमाचा आदेश
राग नकाे मह्या बाळा, जग प्रेमानं जिकणं !५!