मम्मी
मम्मी


ममी म्हणजे
वर्षांनुवर्षे जतन केलेलं प्रेत,
वर्गात शिकवत असतात बाई ;
तिला आठवते आपली आई
अन् ती विचारते घाई घाई,
हालअपेष्टा काढून,
सतत भावना गोठवत
हज्जारवेळा जिवंतपणी मरत असते आई,
तिला गृहीत धरताना
कुणालाही काही वाटत नाही,
म्हणूनच तर सगळे
आईला मम्मी म्हणतात का हो ?
ऐकून विचारात पडल्या बाई !