आयुष्यमंथन...
आयुष्यमंथन...
...मिळाला थोडा मोकळा वेळ
अंतर्मनात डोकावले थोडा वेळ,
केलं समुद्र मंथनासारखं
आयुष्य मंथन आणि मन मंथन
आणि तपासला मनाचा तळ
आणि लक्षात आलं
आत आहे साठला बराच मळ...
दुसऱ्याविषयी घृणा, ईर्ष्या, क्रोध सूडाची भावना
हे सारे टाकून बसलेत गळ
आणि या साऱ्याची स्वतःलाच बसत होती झळ...
यामुळे उठत होती केवळ
आणि केवळ वेदनेची कळ
आणि नकारात्मकतेचं
वाढत होतं बळ...
आणि झालेल्या जखमांमुळे
वाढत होते मनावरचे वळ
आणि करत होते मानसिक छळ थोडा प्रयत्न केला
कमी केला मनातला मळ...
आणि सकारात्मकतेचे
घातले खतपाणी
मग वाईट विचारांचा
हटला बऱ्याच मळ,
आणि हाती लागले
प्रेमाचे अमृत जळ...