STORYMIRROR

Suvarna Jadhav

Inspirational

0  

Suvarna Jadhav

Inspirational

हद्दपार

हद्दपार

1 min
832


पूर्वी रांगोळी काढतांना

मी श्रीराम लिहित होते

रामाची पूजा करत

स्वत:ला धन्य समजत होते...

रामाचा महिमा वाचत गेले

अन धक्क्यावर धक्के बसत गेले

जिच्यामुळे रामायण घडले

त्या दुष्ट मंथरेलाही रामाने माफ केले

अर्धांगीनी सीतेला मात्र

अग्निपरीक्षेला प्रवृत्त केले...

हे सारे वाचले अन

रामाला मी मनातून हद्दपार केले....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational