राखी
राखी


राखीची गोल स्पंजची चक्रं
गायब कधीच झाली
फ्रेकशिप बॅंन्ड सारखी
तुकतुकीत राखी आली.
असो कांही का असेना
बहिण भाऊ जवळ येतात
एकमेकांना बालपणीचं
प्रेम नक्कीच देतात
कोप-यापर्यंत राख्या बांधून
घेतलेले दिवस
परत येणारच नाहीत
देवाला केला जरी नवस.
पोक्तपणा आला लग्नं झाली
वागण्याबोलण्यात मर्यादा आली
तरीही कंठ दाटतोच त्या क्षणी
जेव्हा रेडिओवर वाजतात भावा- बहिणींची गाणी.