STORYMIRROR

Santosh Jadhav

Others

3  

Santosh Jadhav

Others

भार

भार

1 min
6.7K


भार कशाला आभाराचे 

मदतीस सारं गणगोत माझं 

हक्काच्या माणसाच्या मदतीचं 

वाटून घेऊ नये ओझं 

नात्यांच हे आपलेपण मिळालं 

हेच बाकी नशीब थोर 

पाठीशी असता जीवाची माणसं

नसतो एरवी कसला घोर 

हक्काने साद घातली की 

प्रेमाने प्रतिसाद येतो 

एकमेकांच्या भल्यासाठीच 

सध्या आमच्यात वाद होतो 

आभार नसतो वा विनंती इथे 

अडचण आली की फक्त हाक येते 

तयार असतो जो तो 

सा-यांची ताकद एक होत

मग पळतात संकट 

जीव मुठीत घेऊन 

जगतोय एकमेकांच्या सहवासात 

एकमेकांना साथ देऊन 


Rate this content
Log in