STORYMIRROR

Santosh Jadhav

Inspirational

2  

Santosh Jadhav

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
14K


ती मला प्रेरित करेल 

असं चुकूनही वाटलं नव्हतं 

पुरुष अहंकारामुळे कदाचित 

उशीरा लक्षात येतं 

हरेक अडचणीवर तिच्याकडे 

मात करण्याची कला दिसली 

फिस कशी भरायची बाळाची 

हे विचारल्यावर हाती हात देऊन हसली 

सहनशील जास्त बाई असते 

हे तिला पाहिल्यावर कळलं 

संसार कसा बसा भागताना 

तिनं कुरबुरी करायचं टाळलं

अहंकार पुरूषी माझा 

पुरता मी मारुन टाकला 

तिच्या हुशारीमुळे कदाचित 

आजवर संसार टिकला 

ती कायम प्रेरित करत आली 

आई , बहिण, बायको रूपात 

म्हणून तर जगतोय केवळ 

तिच्या प्रेरणेने सुखात 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational