STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

4  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

थोराघरचे श्वान

थोराघरचे श्वान

1 min
41.4K



थोराघरचे श्वान व्हावे, थोराघरचे श्वान

जगात मिळतो मान सदोदित, जगात मिळतो मान


येता - जाता पाय चाटावे, सर्वांचे मन राखावे

मिळेल जो भाकरतुकडा, तो आनंदाने खावे

मालक असता रागामध्ये, ऐकावे पाडूनी कान

थोराघरचे श्वान व्हावे……..


झिडकारले जरी मालकाने, तरी प्रेमळ सदा असावे

कुरवाळून घेण्यासाठी चरणी त्याच्याच बसावे

आपल्या 'मधुर स्वरात' गावे, मालकाचे गुणगान

थोराघरचे श्वान व्हावे………


घरात येती पाहुणे त्यांच्या स्वागता सज्ज असावे

घोटाळावे मागे - पुढे 'अवलोकन' त्यांचे करावे

मनातून जरी जाम टरकतील, म्हणतील तरी 'किती छान!'

थोराघरचे श्वान व्हावे……


मालकाने 'छू' म्हणताक्षणी, सुसाट धावत जावे

लोळवूनी प्रतिपक्षाला, नामोहरम करावे

शब्द राखण्या मालकाचा, करावे जिवाचे रान

थोराघरचे श्वान व्हावे………


लपवून आपली शेपटी, निमूट बसावे दारी

जीभ सदा बाहेर काढूनी, दाखवावी लाचारी

तुकवून मान सदैव खाली, मागावे दयेचे दान

थोराघरचे श्वान व्हावे……….


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational